आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

 

सध्या सगळीकडेच एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. त्यामुळेच भविष्यात करिअरच्या लाखो संधी एआयमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एआय फॉर इंडिया २.० ही मोहीम लाँच केली आहे.

 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त याची घोषणा केली. एआयबद्दलचे सध्याचे बहुतांश कोर्स हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातील कित्येक तरुण यापासून वंचित राहत होते. आता या मोहिमेच्या माध्यमातून एआयचे कोर्स नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

 

 

भारत हा एक उद्योगप्रिय देश आहे. तसेच, आपला देश आता डिजिटल इंडिया या माध्यमातून भारतातील ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना देखील एआय प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत असल्याचंही प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

आयआयटी मद्रासची मान्यता

स्किल इंडिया, ग्रॅब युवर व्हर्नॅक्युलर इम्प्रिंट (GUVI), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) या सर्वांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. इतर संस्थांनी देखील भारतीय भाषांमध्ये टेक्निकल अभ्यासक्रम उपलब्ध करावा असं आवाहन प्रधान यांनी केलं.