मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटा कंपनीकडून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील कंटेट मॉडरेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आली असून कम्युनिटी नोट्स ही नवीन पॉलिसी आणली आहे. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. अमेरिकामधून याची सुरूवात होणार आहे. फॅक्ट चेकपासून सुटका करत आहोत, त्याला एक्सप्रमाणेच (ट्विटर) कम्युनिटी नोट्समध्ये बदल आहोत, अशी पोस्ट मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडियावर केली आहे.
मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करून त्याऐवजी "कम्युनिटी नोट्स" हा नवीन उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या बदलामुळे आता वापरकर्तेच पोस्टवरील सत्यता तपासू शकणार आहेत. मार्क झुकरबर्ग यांच्या मते, कम्युनिटी नोट्समुळे युजर्स स्वत:च पोस्ट्सवरील तथ्यात्मक (FACTUALISTIC) कमेंट्स करू शकतात.
मार्क झुकरबर्ग यांच्यामध्ये यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होईल. याआधी फॅक्ट-चेकिंग प्रोग्रामद्वारे फेक न्यूज किंवा चुकीच्या माहिती तपासली जात होती. पण अनेकदा त्यावर पक्षपातीपणाचे आरोप झाले होते. कम्युनिटी नोट्समध्ये वापरकर्त्यांना पोस्टच्या सत्यतेवर आधारित विविध टिप्पणी करण्याची मुभा असेल. यामुळे विविध बाबी पुढे येतील आणि फेक न्यूजवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट्सना कम्युनिटी नोट्सद्वारे मिळालेली रेटिंग्स आणि कमेंट्स पाहून अन्य युजर्स ती माहिती खरी की खोटी हे समजू शकतील. कम्युनिटी नोट्समुळे युजर्समधील संवाद आणि पारदर्शकता वाढेल. त्याशिवाय चुकीची माहिती रोखण्यासही मदत होईल, असे मेटा कंपनीकडून सांगण्यात आलेय. अनेकांनी कम्युनिटी नोट्स उपक्रमाचे कौतुक करत लोकशाहीला चालणा देणारा उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कम्युनिटी नोट्स म्हणजे काय ?
आतापर्यंत फेसबुक हे थर्ड-पार्टी प्रोग्रामद्वारे फॅक्ट-चेकिंग करत होते. आता हा प्रोग्राम बंद करण्यात आलाय. झुकरबर्ग यांनी फॅक्ट चेकच्या ऐवजी कम्युनिटी नोट्स हा प्रोग्राम आणलाय. यामध्ये, युदर्सच कोणत्याही चुकीच्या माहितीची सत्यता तपासतात. त्यानंतर चुकीची माहिती पोस्ट केल्यास पाणी का पाणी आणि दूध का दूध समोर येईल. लोकांकडूनच एखाद्या गोष्टीची पडताळणी करण्यात येईल. एखाद्याने चुकीची माहिती पोस्ट केली तर त्याखाली रिजेक्ट आणि कारण टाकण्याचा पर्याय येण्याची शक्यता आहे.