अॅपल ने आज 'आयफोन-१६' सीरिजची घोषणा केली. यामध्ये 'आयफोन-१६', 'आयफोन १६ प्लस', 'आयफोन- १६ प्रो' आणि 'आयफोन-१६ प्रो मॅक्स' या चार प्रकारांचा समावेश आहे. या आयफोनमध्ये 'अॅपल आणि इंटेलिजन्स 'व्हिज्युअल इंटेलिजन्स'चा अनोखा मिलाफ यात पाहायला मिळतो. कॅलिफोर्नियात हा मेगा लॉन्च इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी केले. हे आयफोन येत्या दोन ते तीन महिन्यांत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील, उत्कृष्ट कॅमेरा, कैमेरा कंट्रोलच्या नव्या सुविधा आणि इतर गोष्टी ग्राहकांना आकर्पून घेणाऱ्या असल्याचे 'अॅपल' ने सांगितले, हा फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. 'आयफोन-१६ प्रो' आणि '१६ प्रो मॅक्स' यांचा आकार अनुक्रमे ६.३ इंच आणि ६.५ इंच एवढा आहे. 'आयफोन-१५ प्रो सिरीज मधील फोनचा आकार अनुक्रमे ६.१ इंच आणि ६.७ इंच एवढा आहे. या आयफोनमध्ये नोट्स, किनोट्स, मेल, फोटो अॅप हे नेटिव्ह अॅप असतील. 'आयफोन- १६ प्रो'मध्ये डेडिकेटेड कॅमेरा बटन असून त्याचा कॅमेरा ४८ मेगापिक्सल अल्टावाइड लेन्सचा आहे. 'आयफोन- १६ प्रो सीरिज मध्ये 'ए-१८ प्रो चिपसेट'चा वापर करण्यात आला आहे. 'आयफोन- १६ प्रो'चे डिझाईन हे 'आयफोन-१५ प्रो'प्रमाणेच आहे. विशेष म्हणजे आयफोन- १६च्या बॅटरीची
क्षमताही अधिक आहे.
डिस्प्ले झाला मोठा
आयफोनशिवाय 'अॅपल ने आज 'अॅपल वॉच सीरिज- १०', 'अल्ट्रा-२' घड्याळ आणि एअर पॉड-४' चीही घोषणा केली. अॅपल वॉचमधील आतापर्यंतचा मोठा डिस्प्ले असलेल्या 'सीरिज १०' च्या घड्याळात अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे घडयाळ तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार असून तुमच्या शरीरात बदल झाल्यास तो तुम्हाला समजू शकतो. या नव्या उपकरणांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामुळे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील, असा दावा 'अॅपल'ने केला आहे.
अॅपल वॉच
'अॅपल'ने बहुप्रतीक्षित अॅपल बाँच 'सीरिज-१०' बाजारात आणली आहे. अॅपल वॉचमधील आतापर्यंतचा मोठा डिस्प्ले असलेल्या या घड्याळात अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे घड्याळ तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार असून तुमच्या शरीरात बदल झाल्यास तो तुम्हाला समजू शकतो. तुमच्या झोपेवरही अॅपल वॉचचे लक्ष असेल, वॉटर स्पोर्ट खेळणाऱ्यांना या घड्याळाचा चांगला फायदा होणार असून लाटांचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज मिळण्याची सुविधा यामध्ये आहे. याशिवाय 'अल्ट्रा-२' या नव्या घड्याळाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
अॅपल वॉच सीरिज-१०
आतापर्यंतची सर्वांत कमी जाडीचे घड्याळ
सर्वांत मोठा डिस्प्ले, वाइड अँगल डिस्प्ले
स्टेनलेस स्टीलऐवजी ग्रेड-५ टिटॅनियमचा वापर
वेगाने चार्जिंग
बॅटरी क्षमता : १८ तास
किंमत : ४९९ डॉलर
अल्ट्रा-२
ग्रेड-५ ब्लॅक टिटॅनियमचा वापर सर्वाधिक
अचूक जीपीएस
बॅटरी ३६ तास
ऑफलाइन मॅप
किंमत : ७९९ डॉलर
एअर पॉड-४
आतापर्यंतचे सर्वांत आरामदायी
बॅटरी : ३० तास
यूएसबी- 'सी' आणि वायरलेस चार्जिंगची सोय
अॅपल सिलिकॉन
फोर्स सेन्सरचा वापर
किंमत : १२९ डॉलर