सोनाक्षीचे हातावर रंगली झहीरची मेहंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक़्बाल यांच्या लग्नातील क्षण
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक़्बाल यांच्या लग्नातील क्षण

 

बहुचर्चित बॉलिवूड कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे अखेर अधिकृतरित्या लग्नबंधनात अडकले आहेत. रविवारी (23 जून) सोनाक्षी आणि झहीर यांनी स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत त्यांनी लग्न केले.रजिस्टर पद्धतीने पार पडलेला हा विवाहसोहळा सोनाक्षी आणि झहीरच्या नव्या घरी पार पडला. घराच्या बाल्कनीत या दोघांनी रजिस्टर पेपर्सवर सह्या करत त्यांच्या लग्नाची नोंद केली. सोनाक्षीच्या घरी त्यांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली. पण याबरोबरच चर्चा झाली ती सोनाक्षी झहीरच्या ग्रँड रिसेप्शनची.
 
 

लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीरने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. लग्नावेळीचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी माहिती दिली की सातवर्षांपूर्वी २३  जून रोजीच त्यांच्यातील रिलेशनशिपला सुरुवात झाली होती.

कॅप्शनमध्ये लिहिले की 'याचदिवशी ७ वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७ ) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते जपण्याचे ठरवले. आज त्याच प्रमाने आम्ही सर्व आव्हानं आणि अडथळ्यांना पार करत या क्षणापर्यंत पोहचलोय. दोन्ही कुटुंबाच्या आणि दोघांच्याही ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही पती-पत्नी झालो आहोत. आता शेवटपर्यंत प्रेम, आशा आणि सर्व सुंदर गोष्टी एकत्र शेवटपर्यंत जगायच्या आहेत.'
 

रिसेप्शनवेळी सोनाक्षी आणि झहीरने केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती तर गळ्यात चोकर, भांगात भरलेलं कुंकू, हातावर मेहेंदी आणि लाल चुडा असा लूक तिने रिसेप्शनला केला होता तर झहीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. सोशल मीडियावर त्यांच्या या लूकच कौतुक होतंय.
 

सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गजांनी हजेरी लावली. काजोल, रेखा, सलमान खान, अनिल कपूर, चंकी पांडे, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ, हनी सिंह, सायरा बानू, तब्बू, विद्या बालन आणि तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर, रविना टंडन, फरदीन खान, रिचा चड्ढा, अली फैजल, संजय लीला भन्साळी, शर्मीन सेगल, हुमा कुरेशी, साकिब सलीम, संजिदा शेख यांनी हजेरी लावत नवीन जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

रिसेप्शनला सोनाक्षी आणि झहीरने डान्स फ्लोअर गाजवला. हजर राहिलेल्या पाहुण्यांपेक्षा या जोडीने स्वतःच्या रिसेप्शनला खूप डान्स केला. 'छैय्या छैय्या', 'चिकनी कमर','अंग्रेझी बीट','आफरी आफरी' या गाण्यावर त्यांनी डान्स केले. इतकंच नाही तर सोनाक्षीच्या दबंग सिनेमातील गाण्यावर या दोघांनी केलेला डान्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्यतिरिक्त त्यांचं रिसेप्शनला ढोलही वाजवण्यात आला ज्यावर सगळे सेलिब्रिटीज थिरकले. तर हनी सिंहनेही त्याच्या खास मैत्रिणीसाठी रिसेप्शनमध्ये खास परफॉर्मन्स सादर केला. तर सोनाक्षीचे आई वडील शत्रुघ्न आणि पूनम यांच्या हजेरीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

इतकंच नाही सोनाक्षी आणि झहीरने पापाराझींबरोबरही खास फोटोज काढले आणि त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर या दोघांच्या कृतीचं कौतुक होतंय.