बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा जहीर इक्बाल यांचं वैवाहिक जीवन सध्या चर्चेत आहे. लग्नानंतर एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी स्वतःला खास गिफ्ट दिलं आहे. त्याने नुकतीच एक लक्झरी बीएमडब्लू खरेदी केली असून, याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या नवीन गाडीची किंमत जवळपास ९० लाख ते १.३७ कोर्टीच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.
जहीरने पत्नी सोनाक्षीसह नवीन गाडीसमोरचा फोटो शेअर केला असून, चाहत्यांकडून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. जहीर आणि सोनाक्षीने जून २०२४ मध्ये खासगी समारंभात विवाह केला होता. त्यानंतर मोठ्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची भर घालणारी ही नवीन कार त्यांच्या प्रेमाच्या प्रवासातील आणखी एक गोड पायरी ठरली आहे. चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच खास ठरतेय.