'कल्की'ची जगभरात जादू कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 3 d ago
कल्की
कल्की

 

'जवान', 'पठान' आणि 'ॲनिमल'च्या यशस्वी घोडदौडनंतर 'कल्की २८९८ एडी' अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये, २७ जूनला रिलीज होणार होता. नाग आश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला असून चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा गाठला आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल...

प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ४१४. ७५ कोटींची कमाई केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमाई तेलुगु भाषेमध्ये झाली आहे. तेलुगु भाषेत २१२ कोटींची कमाई झाली आहे. तर हिंदी भाषेत १६२ कोटी, तामिळ भाषेत २३ कोटी, मल्याळम १४ कोटी तर कन्नड भाषेत २.८ कोटींची कमाई केलेली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला आहे.

सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात सुमारे ८५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.

2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.