प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला बहुप्रतीक्षित हॉरर कॉमेडी 'भूत बंगला मध्ये तब्बूची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तब्बूने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करत लिहिले, 'आम्ही येथे बंद आहोत.' अशी - पोस्ट केली आहे.
सोशल मीडियावरील तिची ही पोस्ट चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. कारण प्रेक्षकांना 'भूल भुलैया २' नंतर पुन्हा एकदा तब्बूला हॉरर आणि कॉमेडीचा मजेशीर तडका लावताना पाहण्याची उत्सुकता आहे. 'हेराफेरी' चित्रपटामध्ये तब्बू आणि अक्षय कुमार यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रियदर्शन यांनी केले होते.
त्यामुळे प्रेक्षकांना तिच केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार: आहे. या चित्रपटात परेश रावल, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि असरानी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. २०२६ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रियदर्शन यांच्या अचूक दिग्दर्शन कौशल्याने आणि दमदार कलाकारांच्या जोडीमुळे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक अनुभव ठरणार, हे निश्चित आहे.