शाहिद आझमींवरील बायोपिक 'शाहिद'चे मुंबईत स्पेशल स्क्रिनिंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
राजकुमार राव
राजकुमार राव

 

हंसल मेहता दिग्दर्शित आणि राजकुमार राव, के. के. मेनन, प्रभलीन संधू व तिग्मांशु धूलिया अभिनित 'शाहिद' या चित्रपटाची वर्सोवा होमेज सोसायटीतर्फे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा हा आनंद सोहळा आहे. 'सत्या' सारख्या दर्जेदार सिनेमांच्या निर्मितीसाठी ओळखली जाणारी वर्सोवा होमेज सोसायटी ही संस्था प्रभावी सिनेमा साजरा करण्यासाठी समर्पित आहे. 

सत्यकथेवर आधारित हा चित्रपट वकील शाहिद आजमी यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकतो. छोट्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकत भारतीय सिनेमातील एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. 'बोहरा ब्रदर्स' बॅनरखाली सुनील बोहरा यांच्या या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार सुरू आहे. हंसल मेहता म्हणाले, "शाहिद' हा केवळ एक चित्रपट नसून माझ्या वैयक्तिक आणि दिग्दर्शकीय प्रवासाची ओळख आहे." या खास स्क्रीनिंगनंतर 'शाहिद' लवकरच पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाहिद आजमी हे एका गरीब कुटुंबातून आले होते. त्यांनी जीवनभर  संघर्ष आणि समाजातील अन्यायाविरोधात लढा दिला होता. २०१० मध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 'शाहिद' चित्रपटात राजकुमार राव यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे.  हंसल मेहता यांनी 'शाहिद' चित्रपटाविषयी सांगितले की, 'शाहिद' केवळ एक चित्रपट नसून, त्यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनाचा विचार सुरू आहे. यामुळे एक नवा वयस्तर प्रेक्षक वर्ग याला पुन्हा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाईल. शाहिद आजमी यांच्या कार्याची ओळख नवीन पिढीला होईल. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter