अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक असून बांद्रा कोर्टाने त्याला पाच दिवसांच्या पोलिस कस्टडीमध्ये पाठवले आहे. दरम्यान सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सैफची बहिण सोहा अली खान या या घटनेनंतर पहिल्यांदाच एका इव्हेंटमध्ये दिसली. तिने भावाच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानले.
सैफच्या तब्बेतीबाबत बोलताना सोहा म्हणाली, "आम्ही खूप आनंदी आहोत की तो आता ठीक होत आहे आणि आम्ही त्यासाठी खूप आभारी आहोत. आम्ही खूप भाग्यशाली की त्याच्या आरोग्याची स्थिती अजून वाईट झाली नाही. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद!!"
दरम्यान, रविवारी मुंबई पोलिसांनी चाकूने हल्ला केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद अटक केली आणि त्याला कोर्टात सादर केले. आरोपी हा बांगलादेशी असल्याचे म्हटले जात होते. परंतु शहजादच्या वकिलांनी तो बांगलादेशी नसून तो भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. तर सरकारी वकिलांनी तो बांगलादेशी असून तो कोणत्या उद्देशाने भारतात घुसलेला याची चौकशी करायची असल्याचे म्हटले आहे.