सोनाक्षी - झहीर यांच्या विवाहास शत्रुघ्न सिन्हा लावणार हजेरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
शत्रुघ्न सिन्हा,सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक़्बाल.
शत्रुघ्न सिन्हा,सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक़्बाल.

 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इकबालशी लग्न करणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या बराच काळापासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती पण २३ जूनला ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं निश्चित झालं आहे.
आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शत्रुघ्न सिन्हा लेकीचं लग्नाला हजेरी लावणार आहेत. पहलाज निहालींनी हो गोष्ट स्पष्ट केली.

झूम टीव्हीने शेअर केलेल्या वृत्तानुसार, नुकतंच त्यांनी पहलाज निहलानी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं. या वृत्तामुळे सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबामध्ये वाद असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

सोनाक्षी आणि सिन्हा कुटूंबामध्ये वाद असल्याची चर्चा
सोनाक्षी झहीरशी लग्न करत असल्यामुळे सिन्हा कुटूंब आणि तिच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यावर शत्रुघ्न यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना याबाबत काहीच माहित नसल्याचं सांगितलं. तसंच माझ्या मुलीने मला याबाबत काहीही माहिती दिली नसल्याचं ते म्हणाले. त्यातच सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हानेही त्याला याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या चर्चा अधिक रंगल्याच पाहायला मिळालं.

सोनाक्षीच्या लग्नाचे डिटेल्स
सोनाक्षी आणि झहीर २३ जूनला लग्न करणार असून दादरमधील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून ते दोघेही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचा ड्रेस कोड फॉर्मल वेस्टर्न ठेवण्यात आला आहे. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटूंबीय उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या पत्रिकेवर एक व्हॉइस नोट आहे. तर बॅकग्राऊंडला आफरीन हे गाणं ऐकू येत आहे. कार्डमध्ये सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम ८ वाजता सुरू होईल. तर ड्रेसकोड फॉर्मल कपडे असून लाल रंगाचे कोडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

गेली दोन वर्ष सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत असून सलमान खानच्या एका पार्टीमध्ये त्या दोघांची ओळख झाली होती.