शाहरुखच्या 'जवान' ची क्रेज पोहोचली काश्मीरपर्यंत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ऐतिहासिक कामगिरी केली. हा चित्रपट पाहण्यासाठी देशभरातील प्रेक्षक चित्रपटग्रहांमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाची क्रेज जम्मूकाश्मीरपर्यंत पसरली आहे. 
 
उत्तर जम्मूकाश्मीरमधील हंदवारा गाव नेहमीच हिट लिस्ट वर राहिले आहे. तिथल्या नागरिकांनी आपले आयुष्य कायम दहशतीच्या सावटाखाली जगले. हंदवारा हॉलचा भाग एकेकाळी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी नुकतेच जवानचे स्क्रीनिंग करण्यात आले. जम्मू - काश्मिरसारख्या दहशतवादाने होरपळलेल्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहरुखच्या टीमने जवानचं स्क्रिनींग करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीचे सगळीकडे कौतुक होते आहे. 
 
गेल्याच महिन्यात येथे मेक-शिफ्ट सिनेमा हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी शाहरुखचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा दाखवण्यात आला होता.नुकताच आयोजित करण्यात आलेल्या जवानच्या स्क्रीनिंगला जिल्हा अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. 
 
एप्रिलमध्ये  शाहरूखने दिली होती काश्मीरला भेट:
आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी शाहरुख काश्‍मीरमध्ये गेला होता. काश्‍मीरमध्ये आल्यानंतर तो थेट सोनमर्गला गेला. तेथील ताजवास भागात गाण्याचे चित्रीकरण केले. दोन दिवसांनंतर पुढील चित्रीकरणासाठी त्याने श्रीनगर आणि पुलवामा या ठीकांनाही भेटी दिल्या.  यापूर्वी शाहरुखने काश्मीरला भेट दिली होती,  त्याला तब्बल १ तक उलटून गेले. २०१२ ला ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता.