शाहरुखच्या पठाणचा येणार सिक्वेल?

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
अभिनेता शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान

 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला पठाण चित्रपट २०२३च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवत बाहुबली चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला होता. दरम्यान पठाणच्या सीक्वलबाबत अभिनेता जॉन अब्राहमने मोठी हिंट दिली आहे.

जॉन अब्राहम पठाणमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'पठाण २' आणि त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. जेव्हा जॉनला त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की त्या चित्रपटात मनोरंजक काही नसेल तर त्याला मोठ्या फ्रँचायझी चित्रपटांचा भाग बनायचे नाही. 

पठाणबद्दल काय म्हणाला अभिनेता जॉन
जॉन अब्राहमला पठाणच्या सीक्वलमध्ये इंटरेस्ट घेण्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा खूप खास आणि छान आहे. जॉनने आदित्य चोप्रासोबत धूम, न्यूयॉर्क, काबुल एक्सप्रेस आणि पठाण सारख्या चित्रपटात काम केले आहे. तो म्हणाला की, 'मला वाटते की आदित्यने मला या सिनेमासाठी योग्य समजले आहे आणि आशा आहे की आम्ही जिमसाठी प्रीक्वल बनवू.