यावर्षी हुरून इंडिया यांनी जगभरातील वेगवेगळ्या देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यात भारतातील एकूण १५३९ लोकांचा समावेश आहे. भारतात या क्षणाला १५३९ व्यक्तींकडे १ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात २७२ व्यक्तींचा नव्याने समावेश झाला आहे. मागील ५ वर्षात या यादीत ८६ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात अभिनेता शाहरुख खान याचं नावही आहे. शाहरुख लोकप्रियतेमध्ये अनेक कलाकारांपेक्षा पुढे आहेच मात्र आता आता त्याने इतर कलाकारांना मागे टाकत सगळ्यात श्रीमंत कलाकार असण्याचा मान मिळवला आहे. वाचा एकूण किंग खानची संपत्ती किती आहे.
भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर अंबानी कुटुंब आहे. पहिल्या १० नावांमध्ये देशभरातील बिझनेसमॅनचा समावेश आहे. तर शाहरुख ही या लिस्टमध्ये आला आहे. तो सगळ्यात श्रीमंत भारतीय कलाकार ठरला आहे. त्याने संपत्तीच्या बाबतीत इतर कलाकारांना मागे टाकलं आहे. ५८ वर्षाच्या शाहरुखची सध्याची संपत्ती ७ हजार ३०० कोटी रुपये एवढी आहे. शाहरुखचे अनेक बिजनेस आहेत. त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. सोबतच त्याच्या चित्रपटांसाठीही तो मोठी रक्कम चार्ज करतो. त्याशिवाय एंडोर्समेंट मधूनही तो कोट्यवधींची कमाई करतो. तो कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा मालक आहे.
शाहरुखने या यादीत अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांनाही मागे टाकलं आहे. या यादीत मुंबईतही एकूण ३८६ व्यक्ती आहेत. दिल्लीतील २१७ आणि हैदराबादमधील १०४ लोकांची संपत्ती १ हजार कोटींच्या वर आहे.