किंग खान शाहरुखचा ५८ वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं त्याला लाखो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जगाच्या पाठीवर सर्वाधिक फॅन्स असणारा अभिनेता सेलिब्रेटी म्हणून शाहरुखचे नाव घ्यावे लागेल. अशात त्यानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखचं कौतुक केलं आहे. त्याचं अभिष्टचिंतन करुन त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले.
सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्याप्रती व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. मराठी सेलिब्रेटींनी देखील शाहरुखप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सायराजींनी इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी शाहरुखसोबत फोटो शेयर केला आहे.
सायराजींनी त्यावर लिहिलं आहे की, प्रिय शाहरुख मी यापूर्वी देखील अनेकदा बोलली आहे आणि पुन्हा एकदा सांगते, मला जर मुलगा असता तर तो अगदी तुझ्यासारखाच दिसला असता. दिलीप कुमार आणि माझ्याप्रती तुझी भावना ही तू अनेकदा बोलून दाखवली आहेस.
मला शाहरुखचं एका गोष्टीसाठी कौतुक आहे ते म्हणजे त्यानं नेहमीच त्याच्या कृतीतून आदर दाखवला आहे. माझ्या कठीण काळात त्यानं माझ्याशी संवाद साधला आहे. यासाठी मी नेहमीच त्याची आभारी असेन. अशा शब्दांत सायराजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.
समाज
05 Apr 2025 | 7 min(s) read
भारत
05 Apr 2025 | 5 min(s) read
दुनिया
05 Apr 2025 | 4 min(s) read
भारत
05 Apr 2025 | 2 min(s) read
भारत
05 Apr 2025 | 2 min(s) read