१४ मार्चला बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याचा ६०वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगापूर्वीच त्याच्या मुंबईतील घरी दोन मोठ्या सुपरस्टार्सनी हजेरी लावली आहे. शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघेही बुधवारी रात्री आमिरच्या घरी पोहोचले. या भेटीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आमिरच्या घरी जमले तिन्ही खान
बॉलिवूडमध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर हे तीन खान म्हणजे चाहत्यांचे लाडके सुपरस्टार्स. हे तिघेही एकत्र आले की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आमिरच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच शाहरुख आणि सलमान त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा ही भेट खास असणार हे नक्की होते. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीचा उद्देश वाढदिवसाचे सेलिब्रेशन असू शकते. पण या तिघांनीही मीडियाला काहीच माहिती दिली नाही.
खान सुपरस्टार्सच्या या भेटीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली आहे. काहींना वाटते की, आमिरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन तर काहींना वाटते की, यामागे एखादा सिनेमा असू शकतो.तर काहींनी अंदाज लावला आहे की, तीन खान एकत्र आले की काहीतरी मोठे घडणार, फक्त वाढदिवस नाही तर काहीतरी खास आहे. या चर्चांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
आमिर, शाहरुख आणि सलमान यांनी गेल्या चार दशकांपासून बॉलिवूडवर राज्य केले आहे. त्यांचे सिनेमे, त्यांची स्टाइल आणि त्यांचा चाहता वर्ग यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या तिघांची एकत्र भेट ही बॉलिवूडसाठी आणि चाहत्यांसाठी एक खास क्षण आहे. आमिरचा वाढदिवस उद्या असला तरी ही भेट आजच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.