ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं आहे. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेवटी सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्याम बेनेगल हे चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका टेलिव्हिजनला दिल्या. सोमवारी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दिली. इंडिया टूडेच्या वृत्ताला पिया यांनी दुजोरा दिला आहे. बेनेगल यांना भारत सरकारने १९७६ ते १९९१ सालामध्ये पद्भूषण पुरस्काराने सन्मानिक केलं होतं.
आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या गेलेल्या श्याम बेनेगल यांची ओळख काही भारतापुरती सीमित नाही. तर जगभरातील विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेले आहेत. भारतामध्ये ज्या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपटाची चळवळ सुरु केली त्यामध्ये श्याम बेनेगल यांचे नाव आघाडीनं घ्यावे लागेल. चित्रपट हाच ध्यास आणि चित्रपट हाच श्वास या ध्येयानं श्याम बेनेगल यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.
केवळ चित्रपटच नाहीतर भारत एक खोज सारखी मालिका असो किंवा संविधानाच्या निर्मितीवर तयार केलेला माहितीपट असो या सगळ्यांना अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जगभरातील चित्रपट विषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांमध्ये श्याम बेनेगल यांचे नाव अगत्यानं घेतले जाते. तिथे त्यांचे चित्रपट अभ्यासक्रमाचा भाग आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter