सलमानने मलायकाची भेट घेत केलं सांत्वन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 5 d ago
मलायका अरोरा आणि सलमान खान
मलायका अरोरा आणि सलमान खान

 

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचं 11 सप्टेंबरला झालेल्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला. संपूर्ण खान कुटूंब यावेळी मलायकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. अभिनेता सलमान खाननेही मलायकाच्या घरी जात तिची भेट घेतली आणि तिचं सांत्वन केलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं कि, सलमानने गुरुवारी 12 सप्टेंबरला रात्री मलायकाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि तिचं, तिच्या कुटूंबाचं सांत्वन केलं. तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. अनिल मेहता यांच्या निधनामुळे मलायकाच्या संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला आहे. बुधवारी मलायकाच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक कलाकारांनी मलायकाच्या कुटूंबाचं सांत्वन केलं.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं शाहरुख खान आणि गौरी खान यांनीही मलायकाची भेट घेतली. तर भावना पांडे आणि दिया मिर्झा यांनीही मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, फराह खान, साजिद खान, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांनीही मलायका आणि तिच्या कुटूंबाचं सांत्वन केलं आहे.

मलायकाच्या वडीलांनी बुधवार 11 सप्टेंबरला आत्महत्या केली. दरम्यान पोलीस या प्रकरणावर अधिक तपास करत आहेत. मृत्यूच्या आधी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना फोन करून त्यांच्या तब्येत बरी नसल्याचं आणि त्यांना थकवा आल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं पण हे कृत्य करण्यामागील त्यांचं कारण अजून पोलिसांना समजलं नाहीये. मलायकाच्या आईला या घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांनी अनिल यांनी आत्महत्या केल्याच त्यांच्या जबाबात नाकारलं आहे.