सलमान खानचा आगमी सिनेमा 'सिकंदर'चा टीजर नुकताच रीलिज झाला. हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दीर्घकाळापासून बंपर ओपनिंगच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सलमानसाठी हा सिनेमा महत्त्वाचा ठरेल. प्रेक्षकांच्या लाडक्या भाईजानच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळाला. तर यामध्ये सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.
जेव्हा सिकंदर चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून सलमान खानच्या या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. सिकंदर प्रदर्शित होण्यासाठी बराच वेळ आहे. पण निर्माते सातत्याने या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सलमान खानच्या वाढदिवशी सिकंदर चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला होता. आता पुन्हा एकदा नवा टीझर प्रदर्शित केला आहे. पण, पहिल्यापेक्षा दुसऱ्या टीझर जबरदस्त असून यामध्ये रश्मिका मंदानाची पहिली झलक झाली आहे.
सिकंदरच्या पहिल्या टीझरमध्ये फक्त सलमान खानचे अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले होते. १.४२ मिनिटांच्या पहिल्या टीझरमध्ये सलमान खानचा एक डायलॉग खूप चर्चेत राहिला होता. “सुना है बहुत सारे लोग मेरे पीढे पडे है, बस मेरे मुडने की देर है”, असा जबरदस्त डायलॉग सलमान खान म्हणताना दिसला होता. आता दुसऱ्या सिकंदरच्या टीझरमध्ये त्याहून जबरदस्त डायलॉग, अॅक्शन पाहायला मिळत आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे नवीन टीझरमध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.