आता सलमान झळकणार हॉलीवूडपटात

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
बॉलीवुड अभिनेता सलमान खान
बॉलीवुड अभिनेता सलमान खान

 

बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान आपल्या आगामी चित्रपट ‘सिकंदर’मुळे चर्चेत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत. तर या सिनेमाचा टीझरही रिलीज झाला आणि तो लोकांनाही खूप आवडला आहे. अशातच सलमान खान लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सलमान सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे तो एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेला आहे. दरम्यान या हॉलीवूड चित्रपटाच्या सेटवरून सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सलमान खान खाकी वर्दी मध्ये दिसत आहे. तो एका रिक्षा जवळ उभा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर विविध चर्चा ऐकायला मिळत आहेत. सलमान खानला हॉलीवूड चित्रपटात ऑटो चालकाची भूमिका मिळाली आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. सलमानच्या या प्रोजेक्टबद्दल अजून फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, असे सांगितले जात आहे की चित्रपटात भूमिका असणार आहे.

सलमान खानचा अमेरिकन थ्रिलर चित्रपट
मिळालेल्या माहितीनुसार, हा एक अमेरिकन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत संजय दत्त देखील दिसणार आहे. सलमान खानच्या टीमने रियादमध्ये पोहोचल्यानंतर तीन दिवसांची शूटिंग सुरु केली. 

सलमानच्या ‘सिकंदर’ची उत्सुकता 
सलमान खानचे चाहते ‘सिकंदर’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. काजल अग्रवाल, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर हे देखील चित्रपटाचा भाग असणार आहेत. हा चित्रपट २८ मार्च २०२५ ला ईदच्या दिवशी सिनेमागृहांमध्ये रिलीज होईल.