सलमानला आठवली आयुष्यातली 'ती' भयानक ४५ मिनिटे!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
अभिनेता सलमान खान पुतण्या आरहान खानच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना
अभिनेता सलमान खान पुतण्या आरहान खानच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना

 

बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. यावेळी त्याचे चर्चेत येण्याचे कारण त्याचा सिनेमा नसून त्याचे वयक्तिक आयुष्य आहे. अलीकडेच त्याने त्याचा पुतण्या आरहान खानच्या पॉडकास्ट डंब बिर्याणीमध्ये एक प्रसंग शेअर केला आहे. त्यात त्याने एका विमानात असताना ४५ मिनिटे चाललेल्या भयानक गोंधळादरम्यान त्याने मृत्यूला कसे जवळून पाहिले याबाबत खुलासा केला आहे.

 पॉडकास्टमध्ये तो थरारक प्रसंग सांगताना सलमान म्हणाला, "आम्ही श्रीलंकेहून आईफा सोहळ्यावरुन परतत असताना एक भयानक अनुभव आला. सगळेच मजामस्ती करत होते. अचानक आमचे विमान टर्बुलेंसमध्ये आले आणि आमचे विमान गड गड गड असा आवाज करीत हलू लागले. हे सर्व ४५ मिनिटे सुरु होते. सर्व लोक शांत बसले होते."

तो पुढे म्हणतो, "माझ्या सोबत सोहेल देखील होता. एकाच कुटुंबातील आम्ही दोघे जण होतो. इतर कलाकार देखील होते.  मी सोहेलकडे पाहीले तर तो आरामात घोरत होता. मी एअरहोस्टेस्टकडे पाहीले तर ती येशूची प्रार्थना करीत होती. तेव्हा मला धोक्याची कल्पना आली. पायलट देखील त्रस्त झाला होता. वरुन ऑक्सिजन मास्क खुलले होते. मी मनात म्हणालो की हे तर मी चित्रपटात पाहीले होते. आता प्रत्यक्ष जीवनात पहात होतो. ४५ मिनिटे ही सिच्युएशन होती."

त्यांनतरचा प्रसंग सांगताना सलमान म्हणतो, "काही वेळात सर्वकाही ठीक झाले. विमान सुरळीत उडू लागले. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसु आले.नंतर सर्व सामान्य झाले पुन्हा विमान हलू लागले.हे दहा मिनिटे झाले. त्यानंतर पुन्हा सगळे शांत झाले. त्यानंतर विमान लँड होईपर्यंत एकाच्याही तोंडून शब्द फुटला नाही. जसे विमानाच्या बाहेर पाऊल पडले पुन्हा सगळ्याचे चाल बदलली आणि सगळे धाडसी बनले."