'बिग बॉस १८'साठी सलमान खानने घेतले 'इतके' मानधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 Months ago
सलमान खान
सलमान खान

 

बिग बॉस हिंदी आणि सलमान खान म्हणजे एक समीकरण झाला आहे. सलमान खानशिवाय 'बिग बॉस' होऊच शकत नाही. सलमानवर बिग बॉसचे चाहते प्रचंड प्रेम करतात. त्याच्या बोलण्याची स्टाइल, त्याच्या स्पर्धकांना समजावण्याची पद्धत, या सगळ्यांचीच प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. एकही सीझन असा नसेल जिथे चाहत्यांनी सलमानची मागणी केली नसेल. त्याचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. चांगल्याला चांगलं आणि चुकीला शिक्षा देण्याच्या पद्धतीमुळे तो चाहत्यांचा आवडता आहे. त्यामुळेच आता सलमानचा वाढ वधारला असल्याचं चित्र आहे. सध्या 'बिग बॉस १८' सुरू झाला आहे. आणि या सिझनसाठी सलमानने महिन्याला तब्बल नऊ आकडी पगार घेतला आहे. हा आकडा वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील.

किती आहे सलमानचं मानधन
सलमानने 'बिग बॉस १८'ची अतिशय धमाकेदार पद्धतीने सुरुवात केली आहे. हा सीझन त्याने 'समय का तांडव' या थीमसोबत सुरू केला आहे. मिड डेने दिलेल्या माहितीनुसार या सीझनची तगडी सुरुवात करणाऱ्या सलमानने एका महिन्यासाठी तब्बल ६० कोटी रुपये घेतले आहेत. सोबतच प्रत्येक सीझन हा १५ आठवडे चालणारा असतो. त्यामुळे जर हा सीझनदेखील १५ आठवडे चालला तर अभिनेत्याला तब्बल २५० कोटी रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. ही रक्कम इतर कोणत्याही होस्टला मिळणाऱ्या मानधनाच्या रक्कमेपेक्षा खूप मोठी आहे. २५० कोटी एवढं मानधन मिळवणारा सलमान हा एकमेव हिंदी अभिनेता आहे. यापूर्वी सलमानची फी १८० कोटी होती. मात्र आता त्याच्या मानधनात वाढ झाली आहे. दार आठवड्याला सलमान १५ कोटी रुपये घेणार आहे.

'बिग बॉस १८'च्या कलाकारांची नावं
'बिग बॉस १८' मध्ये सहभागी झालेले कलाकार आहेत अरफीन खान, सारा अरफीन खान, तजिंदर बग्गा, गुणरत्न सदावर्ते, अविनाश मिश्रा, रजत दलाल, हेमा शर्मा, ईशा सिंह, श्रुतिका, मुस्कान बामने, निर्रा बनर्जी, चाहत पांडे, ऐलिस कौशिक, चुम दरांग, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, और विवियन डीसेना.