सैफअली खानवर 'असा' झाला जीवघेणा हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
सैफ अली खान
सैफ अली खान

 

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या राहत्या घरात चोर शिरले होते. त्यांनी अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या निवासस्थानी सैफवर हा हल्ला झाला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात अभिनेता जखमी झालाय. गुरुवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात सैफच्या मानेवर आणि पाठीवर मोठी जखम झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आलेत.

सैफ अली खानच्या घरात चोरी करायच्या उद्देशाने हा व्यक्ती शिरला होता. मात्र तेव्हाच सैफला जाग आल्याने त्याने सैफवर हल्ला चढवला. सैफ आणि त्या अज्ञात इसमामध्ये बाचाबाची देखील झाली. त्यानंतर त्याने चाकूने सैफवर चाकू हल्ला केला. त्याच्या पाठीमध्ये जे हत्यार खुपसण्यात आलं होतं, ते बाहेर काढण्यासाठी अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये. त्याच्या मानेवरही १० सेंटीमीटरचा घाव होता. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

सैफच्या हातावर आणि पाठीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की प्रतिकार करणाऱ्या सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर मोठे घाव आहेत. हे शस्त्र बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागतील. 

वांद्रे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कुटूंबियांची याबद्दल चौकशी सुरु आहे. हा व्यक्ती नेमका चोरीच्या उद्देशानेच शिरला होता का याबद्दल अधिकची माहिती पोलीस घेत आहेत.

सैफला हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र तो शुद्धीत आल्यानंतर त्याच्याकडून अधिकची माहिती घेण्यात येणार आहे.

चाकू हल्ल्यात सैफ हा  6 ठिकाणी जखमी झाला  आहे. तसेच त्याच्या घरात काम करणारा कर्मचारी देखील जखमी झाला.  सैफच्या 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अज्ञात हल्लेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसला  प्रथम त्याने मोलकरणीसोबत भांडण केले आणि नंतर सैफने मध्यस्थी केली आणि हाणामारी झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. डीसीपीनुसार (झोन ए ) च्या ११व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये चोर घुसला होता.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter