'हे' सितारे करणार चंदेरी दुनियेत कमबॅक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बाॅलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या बाबाले साथ है', 'हेरा फेरी' आणि 'अस्तित्व' सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांनी तिच्या भूमिकांना भरभरून दाद दिली. त्यातच तब्बू आता एका रोमांचक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिचा आगामी 'डून : प्रोफेसी' यामधून 'सिस्टर फ्रान्सिस्का ची भूमिका एक थरारक आणि आकर्षक ठरणार आहे. नुकतेच या शोचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आहे. त्यात तब्बू अतिशय दमदार लूकमध्ये दिसत आहे. १६ डिसेंबरपासून जिओ सिनेमाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिच्या चाहत्यांसाठी हा शो उपलब्ध होणार आहे. 

'डून: प्रोफेसी' हा शो दहा हजार वर्षांपूर्वी घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. दोन बहिणी मानवतेला वाचवण्यासाठी शौयनि लढतात. शोचे कथानक अत्यंत आकर्षक असून तब्बूच्या व्यक्तिरेखेलाही अधिक रोचक बनवते. काळ्या रंगाच्या मोठ्या कपड्यात आणि चेहऱ्यावर गंभीर भाव असलेली १ पोस्टरमधील तब्बू तिच्या अभिनयाची ताकद स्पष्टपणे दाखवत आहे. मॅक्सवर प्रीमियर हा शो १५ डिसेंबरला होणार असून १६ डिसेंबरपासून जिओवर इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांसाठी हा शो पर्वणी ठरणार आहे. तब्बूने अलीकडेच अजय देवगणसोबत 'औरों में कहा दम था' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही; परंतु 'कू' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

सैफ अली खान झळकणार साऊथमध्ये
सैफ अली खान सध्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रेस ४' सारख्या धमाकेदार चित्रपटाचा समावेश आहे. त्याचबरोबर एका दक्षिण भारतीय चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीय अभिनेता नानीच्या 'गंग लीडर' या चित्रपटावर आधारित या चित्रपटाने २०१९ मध्ये प्रदर्शित प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. त्यामुळे सैफने भूमिकेसाठी होकार दिल्यास अॅक्शनसोबत कॉमेडीत तो दिसणार आहे. सैफ अली खानने याआधीही 'भूत पोलिस' आणि 'गो गोवा गॉन' यासारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन आणि कॉमेडीची झलक दाखवली आहे.
 
त्याचबरोबर भावनिक कथा असलेल्या 'लव आज कल' या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. सैफ आणि करिना कपूरचा 'टशन' देखील चर्चेत राहिला. सैफच्या आगामी चित्रपटांमध्ये त्याचा दमदार अॅक्शन आणि हटके अभिनय पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. विशेषतः 'गैंग लीडर'च्या रिमेकमध्ये त्याची भूमिका किती वेगळी असेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.