अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शाहरुख खानची ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी करणारी याचिका महाराष्ट्र सरकार मंजूर करू शकते. या याचिकेमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शाहरुख खानचे घर मन्नत उभारले आहे, त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकार शाहरुख खानची पत्नी गौरी खानची सुमारे ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी करणारी याचिका मंजूर करू शकते. ही याचिका गौरी खानने मुंबई उपनगर (एमएसडी) विरोधात दाखल केली आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांचे घर मन्नत ज्या जमिनीवर बांधले आहे त्यासाठी एमएसडीच्या कलेक्टरला अतिरिक्त पैसे देण्यात आले होते. आता महाराष्ट्र सरकारने हे पैसे त्याला परत करण्याचा निर्णय घेतला होता.
नेमके प्रकरण काय?
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या नावावर, बांद्रा पश्चिम येथील बँडस्टँडमध्ये नोंदणीकृत असलेला हा बंगला मूळतः राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. नंतर सरकारने या कराराला मंजुरी दिली, त्यानंतर मालकाने शाहरुख खानला मालमत्ता विकली. यानंतर या शाहरुख आणि गौरीने 'मन्नत' असलेल्या जागेसाठी दिलेले अतिरिक्त पैसे परत करण्याची मागणी केली आहे.
गौरी आणि शाहरुखने मार्च २०१९ मध्ये रेडी रेकनर किमतीच्या २५ टक्के रक्कम भरली होती, जी २७.५० कोटी रुपये होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख-गौरी यांना नंतर कळले की, राज्य सरकारने कन्वर्जन फी मोजताना अनवधानाने चूक केली होती. कन्वर्जन फी मोजताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शाहरुख खानची पत्नी गौरी खानची सुमारे ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी करणारी याचिका मंजूर करू शकते.