धर्मरेषा ओलांडणारी कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची प्रेमकहाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
कुणाल खेमू आणि सारा अली खान
कुणाल खेमू आणि सारा अली खान

 

बॉलिवूड अभिनेता आणि पतोडी घराण्याचा जावई कुणाल खेमू याचा आज वाढदिवस. कुणाल आजवर अनेक चित्रपटातून आपल्या भेटीला आला आहे. त्याने काही चित्रपटात गंभीर भूमिकाही केल्या पण त्याच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.

बॉलीवुडमधील त्याच्या करियरपेक्षा लोकांना उत्सुकता असते ती त्याच्या खासगी आयुष्याची. कारण कुणालचं प्रेमप्रकरण, लग्न आणि संसार हे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. कुणाल खेमू आणि सैफ अली खान याची बहीण सोहा अली खान यांच्या प्रेमप्रकरण बरेच गाजले होते. त्यांनी नंतर लग्नही केले आणि ते सुखाने संसार करत आहेत. पण कुणाल आणि सोहाची लव्हस्टोरी काहीशी खास आहे. कुणालने आपल्या प्रेमासाठी करपलेलं जेवणही खाल्लं होतं.. त्याचाच हा किस्सा..

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

 

कुणाल आणि सोहा 'ढूँडते रह जाओगे या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात काही खास बोलणं सुरू झालं नाही. या चित्रपटात दोघेही खूपच प्रोफेशनल राहून काम करत होते.


त्यांनतर त्यांची पुन्हा भेट '९९' या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी पहिल्यांदा सोहा अली खानला कुणाल विषयी काहीतरी वाटून गेलं आणि तिथेच त्यांनी एकमेकांना मैत्रीचा हात पुढे केला. कुणालला सोहा विषयी कायमच हेवा वाटायचा कारण, इतकी शिकलेली मुलगी, तेही ऑक्सफर्डमधून पदवी प्राप्त केलेली मुलगी  या क्षेत्रात काय करतेय, असं त्याला वाटायचं.

हळूहळू त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातूनच पुढे त्यांचं प्रेम फुलत गेलं. कुणालने खास फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं. यांच्या प्रेमातली एक गंमत म्हणजे, सोहाला स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता. सोहा आयुष्यात कधीच किचनमध्ये गेली नव्हती. पण लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय सोहाने घेतला आणि काहीतरी पदार्थ करू लागली.

पण झालं असं की, संपूर्ण स्वयंपाक तिनं करपवून ठेवला. पान कुणालचा तिच्यावर प्रचंड जीव होता. त्यामुळे कुणालने ते अगदी प्रेमाने खाल्लं. त्यांनतर त्यांनी सोहाच्या आईसोबत म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्नाची बोलणी केली. कुणाल आणि सोहा हे २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले. आता त्यांना एक मुलगी असून तिचे नाव 'इनाया' असे आहे.