सासूबाईंसोबत शिर्डीला पोहोचली कतरीना कैफ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
कतरीना कैफ सईबाबांचे दर्शन घेताना
कतरीना कैफ सईबाबांचे दर्शन घेताना

 

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधल्यानंतर ती त्यांचे सगळे सणवार अगदी आनंदाने साजरे करताना दिसते. दिवाळी असेल किंवा करवाचौथ, सगळेच सण ती मनापासून करताना दिसते. तिचे आणि सासरच्यांचे देखील खूप छान संबंध असल्याचं दिसतं. तिचे सासू- सासऱ्यांसोबतचे अनेक फोटो कायम व्हायरल होताना दिसतात. अशातच आता कतरीना तिच्या सासूबाईंसोबत चक्क शिर्डीला पोहोचली आहे. तिचा शिर्डी संस्थानामधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

कतरीना सोमवारी सासूबाई वीणा कौशल यांच्यासोबत शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात त्यांचं सासू-सुनेचं नातं आणखी अधोरेखित होतंय. कतरीना तिच्या सासूबाईंसोबत त्यांच्या साईबाबांच्या मंदिरात उभी आहे. ती बाबाचं दर्शन घेत आहे तर त्यांच्या आजूबाजूला गर्दी दिसतेय. कतरीना बराच वेळ बाबांसमोर हात जोडून उभी आहे. त्यानंतर मंदिरातील पुजारी तिला बाबांच्या चरणावरील फुलं देतात आणि तिथे पुन्हा एकदा कतरीना डोकं टेकवून बाबांचा आशीर्वाद घेते.

कतरीना आणि वीणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. साईबाबांच्या दर्शनासाठी कतरीनाने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे. तिच्या चेहऱ्यावरील भक्तीचा भाव पहाऊन नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. तिला हात जोडून प्रार्थना करताना पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत.

नुकतेच विक्की आणि कतरीना यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाले. या निमित्त ते दोघेही राजस्थानला जंगल सफारी साठी गेले होते. कतरिनाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनची मिस्ट्री थ्रिलर फिल्म 'मेरी क्रिसमस' यात दिसली होती. त्यानंतर तिने पुढील कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter