कतरिना कैफच्या कुंभमेळ्यातील उपस्थितीची सर्वत्र चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
कतरिना कैफ  महाकुंभातून मुंबईमध्ये परतली
कतरिना कैफ महाकुंभातून मुंबईमध्ये परतली

 

 अभिनेत्री कतरिना कैफ सासू वीना कौशल सोबत प्रयागराजच्या महाकुंभमध्ये सहभागी झाली होती. या दोघींनी त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान केले. तसेच विधिवत पूजा करत परमार्थ निकेतन आश्रमात भजन ऐकले. यानंतर परमार्थ निकेतन शिविर इथं स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. कतरिना आणि तिच्या सासूबाईंनी साध्वी भगवती यांच्यासोबत संवादही साधला. 


महाकुंभात सहभागी झाल्यानंतर कतरिना म्हणाली, “मी स्वत:ला खूप भाग्यवान मानते की, आज मी इथं येऊ शकले. मी प्रचंड खुश असून हा दिवस माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल आभारी देखील आहे. मी चिदानंद सरस्वती यांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. मी इथं एक वेगळा अनुभव घेत आहे. मला इथं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिसतेय. इथल्या प्रत्येक गोष्टीत एक सौंदर्य आहे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे.” 

नुकतीच कतरिना आणि तिची सासू मुंबईत परतले आहेत. तेव्हा त्यांनी एक साधे कपडे घातले होते. माध्यमांच्या व्हिडिओमध्ये कतरिना कलीना एयरपोर्टवरून बाहेर पडताना आणि कारमध्ये जात असताना दिसत आहे. कतरिनाने यामध्ये एक साधा पिवळा सूट परिधान केला होता. यात ती तिच्या सासूशी एकसारखीच पिवळी कुर्ता सेट घालून ट्विन करत दिसली. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेतले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter