शाहरुखच्या जवानचा जगभर डंका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुंबई : शाहरुख खानचा जवान आज ७ सप्टेंबरला भारतात नाही तर जगभरात रिलीज झालाय. जवान पाहण्यासाठी गेले २ दिवस प्रेक्षक तिकीटगृहाबाहेर रांगा लावुन उभे होते. स्वतःची झोपमोड करुन मध्यरात्री दोन वाजता जवानचं तिकीट बूक करण्यासाठी प्रेक्षक जीवाचं रान करत आहे.
 
आज अनेक ठिकाणी पहाटे ५ वाजता जवानचा फर्स्ट डे फर्स्ट शो दाखवण्यात आला. मल्टिप्लेक्सबरोबरच एक पडदा चित्रपटगृहांमध्ये बुकिंगची रेकॉर्डब्रेक नोंद झाली आहे. छोट्या सेंटरवरील तिकिटे संपूर्णतः विकली जात आहेत. हा चित्रपट मोठा इतिहास घडविणार असे तज्ज्ञांचे मत आहे. तर अनेकांनी हा शो पाहून ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात.
 
वाचा जवानचा Twitter Review
एका यूजरने लिहिले - शाहरुख खानने आपल्या एनर्जी आणि स्वॅगने अख्खा सिनेमा खाल्लाय. जवान प्रत्येक प्रकारे एक चांगला सिनेमा आहे. मास स्टोरी, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि अॅक्शन स्टंट. अवश्य पहा.
याशिवाय आणखी एका युजरने लिहिले, "ओरडून ओरडून घसा बसला. प्रेक्षक शाहरुखच्या एन्ट्रीला वेडे झालेत. "

सिनेसमीक्षक तरण आदर्शने जवान पाहिल्यावर सिनेमाला ५ स्टार दिलेत. "B L O C K B U S T ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ #Atlee ने एक उत्कृष्ट सिनेमा सादर केला आहे, जो मानवी भावना आणि अॅक्शनचा एक सुखद धक्का आहे. हे वर्ष किंग खानचे आहे #ShahRukhKhan𓃵. #विजयसेतुपती #नयनतारा आणि इतर कलाकारांनी छान काम केलंय. चुकवू नका !!"

मोशा नावाने लोकप्रिय असलेल्या ट्वीटर युजरने जवान पाहून रिव्ह्यू दिलाय. #जवान अर्ली रिव्ह्यू B L O C K B U S T E R: ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ #Atlee ने एक जबरदस्त सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय #ShahRukhKhan𓃵 #विजयसेतुपती #नयनतारा आणि इतर सर्व कलाकारांनी लय भारी काम केलंय

एका ट्विटर युजरने लिहिले की, शाहरुख खानची सिनेमातली एन्ट्री जबरदस्त होती. पहिला हाफ लय भारी तर मध्यंतरानंतर अंगावर शहारे आणणारे प्रसंग आहेत. अनिरुद्धचं बॅकग्राऊंड म्युझिक कमाल आहे. अॅटलीने लिहीलेली 
पटकथा लय भारी

शाहरुखचा या वर्षातला दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा
एकुणच शाहरुख आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं असंच म्हणता येईल. शाहरुखने पुन्हा एकदा भारतातल्या तमाम प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचुन आणलंय. शाहरुखचे फॅन असे वा नसो प्रेक्षक मात्र जवान पाहण्यासाठी एकच कल्ला करत आहेत.

आता शाहरुखचा जवान बॉक्स ऑफीसवर किती कमाई करतो हे पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. पठाण नंतर शाहरुखचा जवान हा या वर्षातला दुसरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरेल यात शंका नाही
 
जवान हा चित्रपट ॲटली यांनी दिग्दर्शित केला आहे. रेड चिलीज एंटरटेन्मेंटची ही प्रस्तुती आहे, गौरी खान या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर गौरव वर्मा सहनिर्माते आहेत. हाय-ऑक्टेन क्शन सिक्वेन्स, एसआरकेचे आकर्षक विविध लुक्स आणि ट्रेलरमधील दमदार संवादांनी जवान चित्रपट हा अगोदरच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ आणि ‘चलेया’ सारखी गाणी आधीच चार्टबस्टर ठरली आहेत.