टिव्ही सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. मोठ्या हिमतीने ती कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला लढा देत आहे. या मोठा आजार असतानाही या अभिनेत्रीने काम करणे बंद केले नाही. लोकांसमोर एक आदर्श बनत तिने आपल्या कामातून आपली एक वेगळी छाप चाहत्यांच्या मनात पाडली. अशातच आता हिनाची एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये ती एक वेगळ्या अंदाजात चहात्यांना पहायला मिळणार आहे.
हिना खानची नवीन वेब सिरीज 'गृह लक्ष्मी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये हिना खान खऱ्या आयुष्याप्रमाणेच आपला अभिनय करताना पहायला मिळतेय. हिना खान पहिल्यांदा अॅक्शन अवतारामध्ये पहायला मिळाली आहे.
हिना खानचा अॅक्शन मोड
'गृह लक्ष्मी' वेब सिरीजच्या 18 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये हिना खान एका अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये हिना खान , 'नौकरानी नहीं, रानी हूं मैं!' हा वाक्यातून आपला एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना दाखवून दिला आहे. ट्रेलरमध्ये हिना खानचा मोलकरीनपासून ते राणीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
'गृह लक्ष्मी' सिरीज कोठे आणि कधी होणार रिलीज?
निर्मात्याने 'गृह लक्ष्मी' सिरीजच्या ट्रेलरसोबत प्रदर्शनाची तारीख ही जाहीर केली आहे. 16 जानेवारी 2025 रोजी ही वेब सिरीज एपिक ऑन वर पहायला मिळणार आहे.
'गृह लक्ष्मी' च्या थ्रिलर सिरीजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे. चंकी पांडे, राहुल देवे आणि दिव्येदु भट्टाचार्य हे प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. या सिरीजमध्ये हिना खान हिचा वेगळा अभिनय दाखवण्यात आला आहे.