शाहरुखने भरला 'इतक्या' कोटींचा टॅक्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 d ago
शाहरुख खान
शाहरुख खान

 

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान कर भरणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ९२ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळ चित्रपट अभिनेता विजय आहे, ज्याने गेल्या आर्थिक वर्षात ८० कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.

खेळाडूंमध्ये आयकर भरण्याच्या बाबतीत क्रिकेटपटू विराट कोहली पहिल्या स्थानावर असून, त्याने 66 कोटींचा आयकर भरला आहे, तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३८ कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सेलिब्रिटी करदात्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार शाहरुख खानने ९२ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.

अभिनेता विजय ८० कोटींच्या करासह दुसऱ्या स्थानावर तर सलमान खान ७५ कोटींच्या आयकरासह तिसऱ्या स्थानावर आहे. बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी २०२३-२४ मध्ये ७१ कोटी रुपये आयकर भरला आहे. अजय देवगणने ४२ कोटी आणि रणबीर कपूरने ३६ कोटींचा आयकर भरला आहे.

हृतिक रोशनने २८ कोटी रुपये, कपिल शर्माने २६ कोटी रुपये, करीना कपूरने २० कोटी रुपये, शाहिद कपूरने १४ कोटी रुपये, कियारा अडवाणीने १२ कोटी रुपये आणि कतरिना कैफने ११ कोटी रुपये कर भरला आहे.

या यादीत पंकज त्रिपाठीचाही समावेश आहे. त्यांनी ११ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. आमिर खानने ११ कोटी रुपये, मल्याळम चित्रपट अभिनेता मोहन लालने १४ कोटी रुपये, अल्लू अर्जुनने १४ कोटी रुपये आयकर भरला आहे.

क्रिकेटपटूंमध्येही मोठ्या संख्येने सेलिब्रिटी करदात्यांचा समावेश आहे. विराट कोहली ६६ कोटींचा कर भरून पहिल्या स्थानावर आहे. माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने ३८ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०२३-२४ या आर्थिक वर्षात २८ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने 13 कोटी रुपये आणि ऋषभ पंतने १० कोटी रुपये आयकर भरला आहे.