'हे' आहेत कारगिल वीरांची यशोगाथा सांगणारे चित्रपट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आज सर्वत्र कारगिल विजय दिवस हा साजरा केला जात आहे. २५ वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी आपल्या शौर्य आणि धाडसाने कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेली कारगिलची ठिकाणांवर भारताचा झेंडा रोवला.

मात्र ही लढाई सोपी नव्हती. या युद्धात ५०० हून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल विजय दिवस लोकांना समजावा यासाठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनविले गेले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

कारगिल युद्धावर अनेक चित्रपट बनले आहेत, जे पाहून तुमचे डोळे पाणावतील. स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित बॉलीवूड चित्रपटांची यादी खुप मोठी आहे. आज तुम्ही घरबसल्या हे सिनेमे पाहू शकतात.

मौसम -
'मौसम' या चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते. शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.या चित्रपटात कारगिल युद्धाव्यतिरिक्त मुंबई बॉम्बस्फोटाचेही काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

टैंगो चार्ली -
अजय देवगणची मुख्य भुमिका असलेला टँगो चार्ली हा सिनेमा देखील कारगिल युद्धावर आधारित आहे. अजय देवगणसोबत या सिनेमात बॉबी देओल, संजय दत्त, सुनील शेट्टी, नंदना सेन, तनिषा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट यूट्यूबवर तुम्हाला पाहता येईल.

लक्ष्य -
२००४ साली प्रदर्शित झालेला 'लक्ष्य' हा चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. कारगिल युद्धाचे अनेक प्रसंग तुम्हाला या चित्रपटात दिसतील. Netflix वर हा चित्रपट तुम्हाला दिसेल.

गुंजन सक्सेना -
जान्हवी कपूर चा 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट देखील तुम्हाला कारगिल युदधाच्या काळात घेवुन जातो. पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांची कहाणी तुम्हाला या चित्रपटात दिसेल. गुंजन सक्सेना या युद्धातील पहिल्या महिला वैमानिकांपैकी एक आहेत. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर सोबत पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'गुंजन सक्सेना' नेटफ्लिक्सवर पाहता येइल.

शेरशाह -
शेरशाह हा सुपरहिट सिनेमा शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा बायोपिक आहे. हा चित्रपट कारगिल युद्धावरच आधारित आहे. या युद्धातच कॅप्टन विक्रम बत्रां शहिद झाले होते. यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि शिव पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येइल.

एलओसी कारगिल -
२००३ मध्ये प्रदर्शित झालेला एलओसी या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारखे मोठे बॉलिवूड कलाकार दिसले होते. प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येइल.