आमीरने घेतलं 'इतक्या' कोटींचे आलिशान घर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बॉलीवुडमध्ये काम करणारे स्टार्स, सुपरस्टार्स यांची कोटींची संपत्ती असते हे आपण ऐकून आहोत. त्यांच्या आलिशान गाड्या, त्यांची लाईफस्टाईल मधून आपल्याला त्यांचा थाट पाहायला मिळतोच . मात्र त्यांच्या घरांच्या किमती देखील कोटींमध्ये असतात. बॉलीवुडचे अनेक सुपरस्टार्स मोठ मोठ्या बंगल्यात तर कुणी आलिशान फ्लॅट्समध्ये राहतं. प्रत्येकाचं आपलं स्वत:च आलिशान घर घेण्याचं स्वप्न असतं. अशीच या कलाकारांची देखील स्वप्ने आहेत.

बॉलीवुडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानला देखील लॅविश घरांची हौस असल्याचं दिसतय. मुंबईतील पाली हिल परिसराचं आमिर खानला विशेष आकर्षण दिसतय. नुकतच आमिर खानने पुन्हा एकदा पाली हिल परिसरातील आकर्षक इमारतीत लॅविश अपार्टमेंट खरेदी केली असल्याचं कळतय. आमिरच्या या नव्या घराची किंमत थक्क करणारी आहे. या घराची किंमत तब्बल ९.७५ कोटींची असल्याचं एका प्रसिद्ध वेब पोर्टलमध्ये सांगण्यात आलय. ही जागा १,०२७ स्क्वेअर फिट असल्याचं बोललं जातय. या घरासाठी आमिरने तब्बल ५८ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरलीय. पाली हिल हा परिसर मुंबईतील सगळ्यात प्रतिष्ठित आणि मागणी असलेलं ठिकाण आहे. याच परिसरात आमिरची आणखी काही घरं आहेत. मात्र पुन्हा एकदा याच परिसरात घर घेण्याचा निर्णय आमिरने घेत त्याच्या रियल इस्टेट संपत्तीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतय.

याशिवाय बांद्रा येथे समुद्र किनारी देखील आमिरचं घर आहे. हे घर दोन मजली असून ५००० स्क्वेअर फिटच्या या घरात पार्टी आणि खास मेजवानीसाठी मोठी जागा देखील आहे. तर २०१३ मध्ये आमिरने पाचगणी येथे देखील फार्महाऊस विकत घेतलं होतं. हे फार्महाऊस त्याने तब्बल ७ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. जिथे त्याचं घर २ एकर जागेत स्थित आहे. पाचगणी हे देखील आमिरचं आवडतं ठिकाण असल्याचं त्याने म्हटलं होतं.

'लालसिंह चड्ढा' या चित्रपटानंतर आमिरने सिनेविश्वातून ब्रेक घेतलं असल्याचं बोललं गेलं होतं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळालं होतं. मात्र त्यानंतर 'लापता लेडिज' चित्रपटाची निर्मिती आमिरने केली. पूर्व पत्नी किरण रावने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर सध्या आमिर हा त्याचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' साठी काम करतोय.