श्रीनगरमध्ये इम्रान हाश्मीच्या 'ग्राउंड झीरो'चा ऐतिहासिक रेड कार्पेट प्रीमियर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एक्सेल एंटरटेन्मेंटच्या 'ग्राउंड झीरो' या ए थरारक अॅक्शनपटामुळे ३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये रेड कार्पेट प्रीमियरचं आयोजन होणार आहे. 'दिल चाहता है' आणि 'डॉन' सारखे ब्लॉकबस्टर देणाऱ्या एक्सेलने निर्मिती केलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर १८ एप्रिलला होणार आहे. तो प्रथम बीएसएफ जवान आणि आर्मी अधिकाऱ्यांसाठी दाखवला जाणार आहे. ही ऐतिहासिक बाब केवळ चित्रपटासाठीच नव्हे, तर जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची मानली जात आहे. 

'ग्राउंड झीरो' ही कथा काश्मीरमध्ये घडलेल्या सत्य घटनांवर आधारित असून, बीएसएफ कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या शौर्यकथेला रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे. अभिनेता इमरान हाश्मीने या भूमिकेतून 'गाझी बाबा' नावाच्या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या वीराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तेजस देवास्कर दिग्दर्शित आणि रितेश सिथवानी व फरहान अख्तर निर्मित हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लष्कराच्या इतिहासातील हा दुर्लक्षित, पण तेजस्वी अध्याय 'ग्राउंड झीरो'च्या माध्यमातून उजळून निघणार आहे.