मिथुन चक्रवर्तीं यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 d ago
 मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती

 

हिंदी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या सिनेमामधील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके परस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७० व्या नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत सांगितलं की, कोलकाताच्या रस्त्यांवरुन चित्रपटांच्या विश्वात उंची गाठून मिथुनदा यांनी प्रत्येक पिढीला इन्स्पायर केलं आहे. मला आज घोषण कताना अभिमान वाटतोय की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने मिथुन चक्रवर्ती यांना इंडियन सिनेमांमध्ये त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिथुन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास गौरवास्पद होता. त्यांचा सुपरहिट सिनेमांमध्ये डिस्को डान्सार, अग्निपथ यांचा समावेश आहे. मिथुन यांचा जन्म कोलकाता येथे झाला. पुढे ते सिनेसृष्टीत दाखल झाले आणि आपल्या अदाकारीने सर्वांनाच भुरळ घातली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter