दिग्दर्शक अनुराग कश्यपने घेतला मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
दिग्दर्शक अनुराग कश्यप
दिग्दर्शक अनुराग कश्यप

 

गँग्स ऑफ वासेपूरसारखा चित्रपट दिग्दर्शित करणारा हिंदी चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुंबई सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मुलाखतीत अनुराग कश्यप यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गुपित सांगितले आहेत. तसेच येथे लोक कलाकार नाही तर स्टार होण्यासाठी येतात असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

एका मुलाखतीत संवाद दरम्यन अनुराग कश्यप म्हणाला, 'मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सद्यस्थितीबद्दल मी नाराज आहे. इथलं वातावरण इतकं नकारात्मक झालंय की माझ्याच मित्रांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. काही अभिनेते त्यांचे स्टारडम टिकवण्यासाठी असामान्य मागणी करतात. दुधाने आंघोळ करण्यासारख्या मागण्या करतात. हे सर्व पूर्ण करणे मला शक्य नव्हते. इथे इंडस्ट्रीत कलाकारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांचा अपमान होतो. असे त्यांना वाटते.

मल्याळम सिनेमाचे कौतुक करताना अनुरागने सांगितले की, इथले लोक एकमेकांना पुढे जाण्यासाठी कशी मदत करतात. ब्लॉकबस्टरपेक्षा चांगले चित्रपट बनवण्याची हौस जास्त आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्जनशीलतेवरही अनुरागने प्रश्न उपस्थित केले आहेत.

आत्तापर्यंतच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनुराग कश्यपने सत्या, शूल, कौन, जंग, ब्लॅक फ्रायडे सारख्या चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी देव डी, गुलाल, गँग्स ऑफ वासेपूर, रमन राघव, मनमर्जियां, दोबारा यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. या वर्षी तो विजय सेतुपती यांच्या महाराजा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.