'यामुळे' शाहरुख विराटला म्हणाला जावई

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 8 Months ago
शाहरूख खान आणि विराट कोहली
शाहरूख खान आणि विराट कोहली

 

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खानने आजवर अनेक चित्रपट केले. त्यासोबतच त्याने अनेक अभिनेत्रींसोबतदेखील काम केले. मात्र, इंडस्ट्रीतल्या एका अभिनेत्रीच्या पतीला तो बॉलिवूडचा 'जावई' मानतो. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. सांगायचे झाले तर, अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिच्यासोबत शाहरूख खानदेखील होता. त्यानंतर अनेक चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केले आहे.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. "विराटसोबत मी बराच वेळ घालवला आहे, कारण तो अनुष्काला भेटायला सतत सेटवर यायचा. त्यामुळे जेव्हापासून अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत आहेत. तेव्हापासून मी त्याला चांगल्याप्रकारे ओळखतो.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शाहरूख पुढे म्हणाला, "मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. मला तो खूप आवडतो. आम्ही त्याला बॉलिवूडचा जावई म्हणतो. इतर खेळाडूंपेक्षा मी विराटला सर्वाधिक ओळखतो. मी विराट आणि अनुष्का या दोघांसोबत बराच वेळ घालवला आहे. अनुष्कासोबत माझे चित्रीकरण सुरू असताना तो तिला भेटायला सेटवर यायचा. त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण झालेय. "असे शाहरूख म्हणाला.