'अनोरा'ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
अनोरा चित्रपटाला यंदाचा ऑस्कर
अनोरा चित्रपटाला यंदाचा ऑस्कर

 

नुकतेच २ मार्चला लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया येथे ९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात "अनोरा" या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. याच सोहळ्यात "द ब्रूटलिस्ट" या चित्रपटाने देखील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले.

दरवर्षीप्रमाणे यावेळीही हा पुरस्कार 23 कॅटेगरींमध्ये देण्यात आला. यावर्षी भारतीय शॉर्ट फिल्म "अनुजा" ऑस्करच्या शर्यतीत होती, परंतु ती विजेता होऊ शकली नाही. ‘अनुजा’ या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकित करण्यात आलं होतं. ‘आय एम नॉट या रोबोट’ या शॉर्ट फिल्मला हा पुरस्कार मिळाला.

गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्या सहनिर्मित ‘अनुजा’ शॉर्ट फिल्मने एक ऐतिहासिक टप्पा गाठला होता.  या सोहळ्यात अनेक मोठ्या कलाकारांना आणि दिग्गजांना मानवंदना देण्यात आली. यात प्रमुख दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्रींचा समावेश होता. ऑस्कर हा जगभरातील चित्रपट कलाकारांसाठी एक मोठा आणि गौरवपूर्ण सोहळा असतो.

ऑस्कर विजेत्यांची यादी :
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : अनोरा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : माईकी मॅडिसन, अनोरा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : अँड्रियन ब्रॉडी, द ब्रुटलिस्ट
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : शॉन बेकर, अनोरा
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : किअरन कल्किन , द रिअल पेन
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : झो सालदानाने , एमिलीया पेरेझ
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : द ब्रुटलिस्ट, लॉल क्राऊली
  • सर्वोत्कृष्ट मूळ संगीत : डॅनियल ब्लूमबर्ग , द ब्रूटलिस्ट
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा : आय एम स्टील हिअर , ब्राझील
  • सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म : आय ॲम नॉट अ रोबोट
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ड्यून पार्ट 2, पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी : ड्यून पार्ट 2, गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म : द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा, मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन
  • सर्वोत्कृष्ट मूळ गाणं : एल माल , एमिलिया पेरेझ
  • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन : विकेड, नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स
  • सर्वोत्कृष्ट संकलन : अनोरा, शॉन बेकर
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग : द सबस्टन्स, पियरे-ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली
  • सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन : विकेड, पॉल टेझवेल
  • सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले : अनोरा, शॉन बेकर
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅडाप्टेड स्क्रीनप्ले: कॉनक्लेव्ह, पीटर स्ट्रॉघन
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म: फ्लो, गिंट्स झिलबालोडिस

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter