'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ गोल्डन ग्लोब पुरस्कारातून बाहेर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट
ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट

 

जागातील सर्वात मोठा पुरस्कार गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२५ नुकताच पार पडला. कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स या ठिकाणी असलेल्या बेव्हरली हिल्टर इथे हा पुरस्कार घेण्यात आला. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भारतातील चित्रपटाला नामांकनही देण्यात आले होते. या पुरस्कारासाठी एमिलिया पेरेझला सर्वाधिक १० नामांकने देण्यात आली होती. भारतातील एकमेव असलेला 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट सिनेमा मात्र कोणताही पुरस्कार जिंकू शकला नाही. एमिलिया पेरेझ या चित्रपाटने मात्र नॉन इंग्रजी चित्रपट श्रेणीत पुरस्कार जिंकला आहे.

'एमिलिया पेरेझ'ला सर्वाधिक १० नामांकने मिळाली होती. त्याचबरोबर शोगुन, विक्ड, चॅलेंजर्स या कलाकृतींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला. 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटात छाया कदम, अभिनेत्री दिव्या प्रभा, कनी कुसृती, हृदू हरुन या कलकारांनी सुरेख अभिनय केलेला आहे.

या पुरस्कारामध्ये 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाला पुरस्कार मिळेल अशी आशा होती. कारण या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. बिफ्टासाठी देखील या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. मुंबईतील नर्स महिलांवर आधारित हा चित्रपट आहे. पायल कपाडिया यांनी अतिशय रंजन पद्धतीनं याची कथा मांडली आहे.

'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' चित्रपटाला मिळाले २१ पुरस्कार
पायल कपाडिया यांचा 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपाटने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. परंतु या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहे. चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ग्रँड पुरस्कार मिळवला. तसंच शिकागोमध्ये सर्वोकृष्ट विदेशी चित्रपटाचा मानकरी ठरला. जगभरात या चित्रपटाने २१ हून अधिक नामांकने मिळवली आहेत. 

'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' काय आहे कथा?
हा चित्रपट एका नर्सच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात नर्स बनलेल्या पात्राचं नाव प्रभा आहे. मुंबईतील जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभा अनेक दिवसांपासून पतीपासून वेगळं राहत होती. अचानक तिला नवऱ्याच्या काही वस्तू सापडतात आणि तिचं आयुष्य बदलते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter