बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आमदार बाबा सिद्दीकी यांची काल १२ ऑक्टोबरला गोळी झाडून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ते नेते होते. शनिवारी रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. यातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नलजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या हत्येनंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याचं राहत घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती तर काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. लॉरेंस बिष्णोई गँगने सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सलमान आणि बाबा सिद्दीकी यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे आणि सलमानला मदत करणाऱ्यांनाही हिशोब द्यावा लागेल असा इशारा बिष्णोई गँगने त्यांच्या धमकीत दिला होता. त्यामुळेच सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून काही दिवस घरातच थांबण्याच्या सूचना पोलिसांकडून त्याला करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच सलमान ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल झाला आणि त्याने त्यांच्या कुटूंबियांचं सांत्वन केलं.

बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञातांनी हल्ला केला यातील दोन जणांना पकडण्यात आलं असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांची पथक मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली येथे रवाना झाली आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter