अभिनेत्री मुमताज यांची इंस्टाग्रामवर एंट्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 1 Years ago
मुमताज
मुमताज

 

 वयाच्या २७ व्या वर्षी केले पदार्पण 

साठ आणि सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयासोबत सौंदर्यामुळेही लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुमताज सध्या सोशल मीडियावर  सक्रिय झाल्या आहेत. 

 

वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केल आहे. पदार्पणानंतर लागलीच मुमताजनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही सुंदर झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मुमताजनं मुलगी नताशा माधवानी सोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मुमताजनं इन्स्टाग्रामवर सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसत आहे. ७५ वर्षाच्या वयात मुमताजच्या एनर्जेटिक डान्स मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

मुमताजची ही झलक पाहून चाहते भलतेच एक्सायटेड आहेत आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मुमताजन काही असे व्हिडीओ शेअर केले आहेत,ज्यात ती वर्कआऊट करताना नजरेस पडत आहे. वयाच्या या टप्प्यावर अभिनेत्रीची जिद्द सगळ्यांनाच हैराण करताना दिसत आहे. चाहते मुमताजच्या या वर्कआऊटला पाहून हैराण होताना दिसत आहेत.

मुमताज यांच्या करिअर विषयी बोलायचं झाल तर त्यांनी ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल. त्यानंतर तिन ६० च्या दशकात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली.

मुमताजनी सगळ्यात जास्त सिनेमे दारा सिंगसोबत केले. 'फौलाद','डाकू मंगल सिंग' सारख्या अॅक्शन सिनेमांत मुमताज आणि दारा सिंग एकत्र दिसले होते. पण या सिनेमांमुळे मुमताज एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाल्या होत्या. त्यांच्यावर स्टंट फिल्म हिरोईन हा ठपका बसला होता. आणि यामुळे मुमताजच्या करिअरवर ब्रेक लागला होता.

पण १९६९ मध्ये आलेल्या 'दो रास्ते' सिनेमानं मुमताजच्या करिअरला योग्य दिशा दिली आणि मग 'आप की कसम','चोर मचाए शोर', 'रोटी', 'प्रेम कहानी', 'तेरे मेरे सपने','हरे राम हरे कृष्णा' आणि 'नागिन' सारखे सिनेमे त्यांनी केले.

त्यानंतर मुमताजनी मध्येच १३ वर्षांचा ब्रेक घेतला. आणि १९९० मध्ये त्यांनी 'आंधिया' सिनेमातून कमबॅक केलं. मुमताजनं हिट सिनेमा देत कमबॅक केल तरी देखील त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला.

 

त्यानंतर त्यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीपासून कायमची दूरी बनवली. काही दिवस आधी पुन्हा मुमताजनी इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. त्या अनेक कार्यक्रमात दिसू लागल्या आहेत. आणि काही आठवडे आधीच त्या धर्मेंद्र यांच्यासोबत 'इंडियन आयडल १३' मध्ये दिसल्या होत्या.