बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत स्टार्सच्या ओपनिंग फिगर्सवर चर्चा रंगत असताना छोट्याशा भूमिकेतून मोठं यश मिळवणारा एक अभिनेता सध्या चर्चेत आहे. फक्त चार फूट आठ इंच उंची असलेल्या जाफर सादिक याने आतापर्यंत कमल हसन, रजनीकांत, शाहरुख खान यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'पाव कधिकल' या तमिळ वेबसीरिजमधून २०२० मध्ये त्याने पदार्पण केलं आणि तेव्हापासून त्याची निवड सुपरहिट प्रोजेक्ट्ससाठी होत गेली.
'विक्रम' (४१४ कोटी), 'जेलर' (६०५ कोटी) आणि 'जवान' (११५० कोटी) अशा दणक्यात हिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये त्याने छोट्या पण लक्षवेधी भूमिका साकारल्या. आतापर्यंतच्या पाच सिनेमांतून एकूण २२०० कोटींचा बिझनेस झाला असून, सलमान, प्रभास, रणबीर यांसारख्या मोठ्या स्टार्सनाही बॉक्स ऑफिसवर मागे टाकणारा जाफर सध्या फिल्म इंडस्ट्रीचा 'हॉट टॉपिक' ठरलाय. शाहरुखच्या तिन्ही ब्लॉकबस्टर सिनेमांनंतर त्याचं सिलेक्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय. सध्या जाफर सादिक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असून, प्रेक्षकांमध्ये त्याचं यशस्वी अस्तित्व जाणवतंय. छोट्या भूमिकांनीही मोठा प्रभाव निर्माण करता येतो, हे त्याने सिद्ध केलंय. त्याच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे तो सध्या भारतीय चित्रपटसृष्टीचा नवा 'लकी चार्म' म्हणून ओळखला जातोय.