महाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर खान उत्सुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
आमिर खान
आमिर खान

 

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्चानिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नेहमीच आपल्या दमदार बा अभिनयासाठी चर्चेत असतो. सध्या तो 'तारे जमीन पर' या २००७ मधील ठोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेत 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, मात्र त्याचबरोबर त्याच्या एका मोठ्या स्वप्नाविषयीही चर्चा रंगू लागली आहे. 

एका अलीकडील कॉन्फरन्समध्ये आमिरने आपल्या महाभारत या ड्रीम प्रोजेक्टबद्दल खुलेपणाने चर्चा केली. त्याने स्पष्ट केले की, हा चित्रपट बनवणे त्याचे जुने स्वप्न आहे आणि आता तो त्यावर विचार करण्याच्या तयारीत आहे. मात्र यात तो स्वतः कोणती भूमिका साकारणार का, याबाबत तो साशंक असत्याचेही त्याने सांगितले. 

तो म्हणाला की, "एक अभिनेता म्हणून तो एकावेळी एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करतो, मात्र निर्माता म्हणून अनेक प्रोजेक्ट्स हाती घ्यायला त्याला आवडते. "मी लवकरच ६० वर्षांचा होणार आहे, पण पुढील १०-१५ वर्षे मी नवे प्रयोग करत राहणार आहे आणि नव्या टॅलेंटला संधी देण्याचा माझा प्रयत्न असेल."

'सितारे जमीन पर' मध्येही आमिर मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटात जेनेलिया डिसूझा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एका नव्या कथासूत्रात गुंतवून ठेवणार आहे. याशिवाय आमिर खान ताहोर १९४७ या आणखी एका महत्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामुळे पुढील काळात आमिर खान कोणत्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.