भारतीय माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा बेग यांनी नुकताच आपल्या लग्नाचा ९वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी, इरफानने छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान देखील दिसत आहे.
इरफान पठाण आणि सफा यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाच्या ९व्या वाढदिवसाचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. त्यात इरफान त्याची बायको सफा बेग हिच्यासोबत केक कापताना दिसत आहेत. त्यांचे प्रियजन उत्साहात टाळ्या वाजवत आनंद साजरा करत आहेत. आमिर खान या जोडीच्या बाजूला उभा राहून आनंद साजरा करत आहे.
या पोस्टमध्ये इरफानने लिहिले आहे की, "या खोलीत काही लोक होते, ज्यांना मी दूरून पाहायचो, पण आता त्यांना मी मित्र म्हणून ओळखतो. आमिर भाई, आमच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी धन्यवाद!!"
या व्हिडिओमध्ये अनेक पाहुण्यांची उपस्थिती देखील दिसल. त्यामध्ये किरण राव, सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर, तसेच माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे यांची उपस्थिती होती.