आमिर खानने 'असा' साजरा केला ७६ वा प्रजासत्ताक दिन

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अभिनेता आमिर खान गुजरातमध्ये देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना
अभिनेता आमिर खान गुजरातमध्ये देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना

 

भारताने २६ जानेवारी २०२५ ला आपला ७६वा प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. या विशेष प्रसंगी देशभरात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि विविध राज्यांमध्ये भव्य समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य जनतेपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वच जण देशभक्तीत रंगले होते. 

दरम्यान, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, ‘संवेदनशील’ आणि ‘विचारी’ अभिनेता अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान याने गुजरातमध्ये आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' समोर त्यांच्या योगदानाला सलामी दिली आहे. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' समोर आमिर खानने तिरंग्याला सलामी देत, सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

यावेळी आमिरने सफेद कुर्ता आणि पायजामा परिधान केला होता. तसेच, त्यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ फुले अर्पण केली. गुजरात माहिती खात्याच्या अधिकृत पोस्टवर त्यावेळची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. त्यात आमिर खान स्टॅच्यू ऑफ यूनिटी समोर श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “#StatueofUnity वर आमिर खान - बॉलीवुड आयकॉन, स्टॅच्यू ऑफ यूनिटी कॉम्प्लेक्समध्ये भारताच्या एकतेचा सन्मान करत आहेत, जे भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या एकतेच्या प्रवासाचे प्रतीक आहे."