पिकलबॉलच्या मैदानात आमिर खान-अली फजलची जुगलबंदी!

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 12 h ago
आमिर खान-अली फजलची जुगलबंदी
आमिर खान-अली फजलची जुगलबंदी

 

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला, पण यावेळी तो मोठ्या पडद्यावर नव्हे, तर प्रत्यक्ष खेळाच्या मैदानात! अभिनेता अली फजलच्या सोबतीने आमिरने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ‘वर्ल्ड पिकलबॉल लीग’मध्ये भाग घेतला आणि चाहत्यांना जबरदस्त मनोरंजनाचा अनुभव दिला.

क्रिकेट किंवा फुटबॉल नव्हे, तर पिकलबॉल या अनोख्या खेळात दोघांनी प्रदर्शनीय सामना खेळला. सामना जरी मैत्रीपूर्ण असला, तरी आमिर आणि अलीच्या हटके कॉमेंट्रीने स्टेडियममध्ये रंगत आणली. त्यांची मस्ती, चपखल टोमणे आणि खेळातील थरार यामुळे प्रेक्षक अक्षरशः हसून लोटपोट झाले. या रोमांचक लढतीत आमिरच्या संघाने १३-८ असा विजय मिळवला, पण या स्पर्धेचा खरा नायक ठरला तो या दोघांचा सहजस्फूर्त अंदाज!

सामन्यानंतर आमिर म्हणाला, "हा खेळ जबरदस्त आहे! जगातील टॉप खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला." तर अलीने मिश्कील अंदाजात सांगितले, "माझे काम फक्त पळण्यात झाले! पण एक मात्र नक्की, पिकलबॉल लवकरच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होईल."

आता आमिर लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे, तर अली फजल ‘मिर्झापूर ३’ सह बॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्हीकडे आपली धमाकेदार एंट्री घेण्यासाठी सज्ज आहे.