लोकसभा निवडणुकीत मुंबईत अनेक केंद्रांवर मतदारांची गैरसोय झाली होती. त्यातून बोध घेत निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी उत्तम नियोजन केले. सायंकाळी पाचपर्यंत मुंबई शहरात ४९ टक्के, तर मुंबई उपनगरात ५१.७६ टक्के मतदान झाले. मुंबईत सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह दिसला, मात्र ११ नंतर हळूहळू रांगा दिसू लागल्या. वयोवृद्ध मतदारांची संख्या अधिक दिसली. शाहरूख खानसह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले. अभिनेता सलमान खान कडेकोट पोलिस बंदोबस्तात आला होता.
मुस्लिम मतदारांचा उत्साह
-
भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर येथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडला. कोळीवाडा परिसरात विशेषतः महिलांमध्ये मतदानाचा उत्साह दिसला.
-
राजकीय पक्षांची वाढलेली संख्या, सर्वच पक्षांमध्ये झालेली बंडखोरी, तसेच निवडणुकीनंतर एखादा उमेदवार स्वतःच्या पक्षात राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी निराशा व्यक्त केली.
-
मुंबईत कुठेही ईव्हीएम बंद पडल्याचा, वा अन्य कोणतीही समस्या उद्भवली नाही.
मराठीसह बॉलिवूडमधील कलाकारांनी मतदान केले. अनेकांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही पहाटे पहाटे मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच सलमान पूर्ण सुरक्षेसह मतदानासाठी पोहोचला होता. तर दुसरीकडे, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी मतदान केंद्रावर पोहोचताच, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter