NEET विषयी केंद्राने सर्वोच्च न्यायालात केला 'हा' मोठा दावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

NEET प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नीट गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ७ राज्यातून आरोपींना अटक, त्यामुळं ७ राज्यात पेपर लीक झाल्याची शंका आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) NEET परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पेपरफुटी कोणत्या स्तरावर झाली आहे आणि याचा गैरफायदा घेतलेल्या लोकांना ओळखणे शक्य आहे का, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

त्यामुळे अनियमितता काही केंद्रांपुरती मर्यादित असेल आणि पेपरफुटी मोठ्या प्रमाणावर झाली नसेल, तर पुन्हा परीक्षा घेणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या सुनावणीत न्यायालयाने एनटीए आणि केंद्राला काही मुद्यांवर उत्तरे दाखल करण्यास सांगितले होते. तसेच सीबीआयकडून स्टेटस रिपोर्टही मागवण्यात आला होता. आणि ज्यांनी पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे त्यांना आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारने या संदर्भात नेमलेल्या समितीला देखील या प्रकरणात आपलं म्हणणं मांडण्याचे न्यायालयाने सांगितले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही? याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे.