विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठात एका वर्षात आता दोनदा प्रवेश घेता येणार आहे. परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबात विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने परवानगी दिली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.
जुलै- ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारी अशा दोन वेळा विद्यापीठात प्रवेश घेता येणार आहे,यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्याल विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अनेकदा परिक्षांचा निकाल उशीरा येतो किंवा काही वैयक्तिक कारणामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत आहे. या विद्यार्थ्यांना जरी जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश घेता आला नाही. तरीही हे विद्यार्थी जानेवारी- फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेऊ शकणार आहेत. यामुळे ज्या विद्यार्थ्याला पहिल्या सत्रात प्रवेश घेता आला नाही, त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
वर्षात दोनदा प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यापीठातील साधनसाम्रगीचा योग्या वापर करता येणार आहे. प्रयोगशाळा, वर्ग या सर्व गोष्टींचा वापर करता येणार आहे. यामुळे विद्यापीठातील काम सुरळीतपणे चालेल. १५ मे २०१४ रोजी झालेल्या बेठकीत युजूसीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यूजीसीने २०२३ मध्ये उच्च शिक्षण संस्थाना ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये गोन वेळा प्रवेश घेण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.