Mughal History NCERT: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) कडून मुघल इतिहासाशी संबंधित प्रकरण काढून टाकण्यावरून वाद सुरू झाला आहे. यावर एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मुघलांवरील प्रकरण काढण्यात आलेले नाही असे त्यांनी सांगितले.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सकलानी म्हणाले, ''१२ वीच्या पुस्तकातून मुघलांची प्रकरणे काढून टाकण्याचा संबंध आहे, तो पूर्णपणे खोटा आहे.''
उत्तर प्रदेशातील १२ वीच्या अभ्यासक्रमातून मुघल इतिहासाचे धडे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NCERT ने इतिहासाच्या पुस्तकातून मुघल दरबार आणि शासक प्रकरण काढून टाकले आहे.
याशिवाय इयत्ता ११ वीचे काही धडेही काढून टाकण्यात आले आहेत. आता NCERT प्रमुखांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करायचे होते त्यामुळे पुनरावृत्ती होणाऱ्या गोष्टी काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश प्रसाद सोलंकी म्हणाले की, हे चुकीचे आणि खोटे आहे मुघलांचे धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले नाहीत. कोविडनंतर, अभ्यासक्रम कमी करण्यावर भर देण्यात आला, जेणेकरून मुलांवरील अभ्यासाचा भार कमी करता येईल. तज्ञांनी अभ्यासक्रम कमी केला आहे.
दुसरीकडे, बारावीतील मुघलांचा धडा काढण्यावर दिनेश सोलंकी म्हणाले की, बारावीतल्या विद्यार्थ्यांना मुघलांचा अभ्यास सुरूच राहणार आहे. फक्त काही भाग कमी झाला आहे. ज्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली आहे, तो भाग फक्त कमी करण्यात आला आहे.
मुघलांच्या धोरणासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. इतिहासाशी छेडछाड केली जात नाही. दोन धड्यांऐवजी फक्त एक धडा शिकवला जाईल. NCERT च्या अभ्यासक्रमातून मुघल दरबाराचा भाग काढला, त्याऐवजी नवीन भाग जोडला जाईल.
एनसीईआरटीच्या बारावीच्या 'थीम ऑफ इंडियन हिस्ट्री २ ' या पुस्तकातील 'किंग्स अँड क्रॉनिकल्स: द मुगल कोर्ट' हा धडा अभ्यासक्रमातून काढून टाकला जात आहे. यासोबतच 'थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री' या इयत्ता ११ वीच्या पुस्तकातून 'सेंट्रल इस्लामिक लँड्स', 'कॉन्फ्रंटेशन ऑफ कल्चर्स' आणि 'द इस्लामिक रिव्होल्यूशन' हे भागही काढले जाणार आहेत.