एक मोठी माहिती समोर येत आहे. जेएनयूमधे सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेले २० वर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणावं लागेल. सदानंद मोरे , पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ही मोठी घडामोड आहे.
विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रूपये निधी जेएनयूला दिला होता. मात्र तेव्हा हे अध्यासन सुरू होऊ शकलं नव्हतं. जेएनयू मधे सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरु व्हावे यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर त्याला यश आलं आहे.